शिंदखेडा येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुल पाटोळे यांची निवड तर न भुतो न भविष्योती जयंती साजरी होणार
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील तहसील कार्यालयाच्या शेजारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 14 एप्रिल रोजी जयंती उत्सव साजरा होणार असून त्या पाश्वभुमीवर जयंती उत्सव समितीची एकमताने राहुल रविंद्र पाटोळे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

तसेच उपाध्यक्ष राहुल जगन्नाथ अहिरे सचिव अजय पानपाटील, खजिनदार निलेश कापुरेसह खजिनदार राहुल कढरे, सल्लागार विजय मोरे, सदस्य सनी बोरसे, रोहित पाटोळे, बाळा नगराळे, प्रवीण बैसाणे, प्रशांत पाटील, सागर बोरसे, गणेश पाटोळे, राजु आखाडे, संदीप पाटोळे, अक्षय पाटोळे, बन्टी पाटोळे, हेमंत पाटोळे, फहीम कुरेशी, यजाज कुरेशी, साजिद कुरेशी आदी युवा नेतृत्वला संधी देण्यात आली. त्यांचे शहरात फटक्याच्या अतिषबाजीने जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहरात सिद्धार्थ नगर पासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नियोजित जागेपर्यत लायटिंगची सजावट केली आहे. जयंती दिवशी सकाळी आठ वाजता सिद्धार्थ नगर ते भगवा चौक पायी शोभायात्रा निघणार आहे. पुतळ्याजवळ नउ वाजता बुद्ध वंदना काॅलनी परिसरात अभिवादन कार्यक्रम तर पाच वाजता एक्स मॅन माजी सैनिकांचा सॅल्युट कार्यक्रम व जागेवर सवादय वादयाची मिरवणूक काढून मानवंदना होणार आहे. अनोख्या पद्धतीत न भुतो न भविष्यती असा जयंती उत्सव साजरा होत असून शहरातील व तालुक्यातील तमाम बुद्ध समाज बांधवसह सर्व जाती धर्मातील जनतेने एकत्र येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल पाटोळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.



