शिंदखेडा शहरात श्रीराम नवमी उत्साहात साजरी
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा येथे श्रीराम चौक मित्र मंडळातर्फे यावर्षी श्रीराम नवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून कोरोना साथरोग असल्यामुळे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला नव्हता यंदा प्रथमच मंडळातर्फे श्रीराम जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे मंदिराचे बांधकाम केंद्र शासनाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने सुरू झाल्याने यावर्षी नागरिकांना पाच हजार बुंदीचे लाडू वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. श्रीराम जयंती निमित्त मंडळाच्यावतीने शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना विधानसभा संघटक गणेश परदेशी स्वामी विवेकानंद ट्रस्ट चे अध्यक्ष गोपाल चौधरी, शिवसेना तालुका समन्वयक विनायक पवार, युवा सेनेचे नाना पहाडी, मंडळाचे अध्यक्ष श्रावण उर्फ मोठा मराठे, गोपाल बाविस्कर, राजु परदेशी, राजू मराठे, बांधकाम ठेकेदार विक्रम बडगुजर, योगेश देसले, लोटन सोनार, मिलिंद पाटील, रोहित पाटील, राहुल कुवर, अनिल कुवर, दीलबर कुवर, गोपाल मराठे, संदीप परदेशी, सुनिल परदेशी, लक्ष्मण मराठ, गोरख बाबा आदी पदाधिकारी उपस्थित होते. मंडळातर्फे बांधकाम ठेकेदार विक्रम बडगुजर यांच्या सहकार्याने लाडू वाटप करण्यात आले.



