वरखेडे गावाचे पत्रकार गजेंद्र पाटलांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पंतप्रधान आवास योजनेचे २५० लाभार्थाचा डिपीआर3 मंजुर
धुळे (प्रतिनिधी) हद्दवाढ गावासह शहरातील लोकांनी पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. त्याला होत असलेला विलंब पाहून वरखेडे गावाचे पत्रकार तथा धुळे ग्रामीण वृत्तपत्राचे संपादक गजेंद्र नारायण पाटील यांनी पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज केलेल्या लोकांना त्वरीत योजनेचा लाभ मिळावा यासाठी मनपाच्या तत्कालीन आयुक्त अजीज शेख यांच्यासह नगर रचना विभागाचे अधिकारी त्यातच पंतप्रधान आवास योजनेचे रोहित सोनार कल्पेश मराठे याच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला. तसेच राज्यांचे राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांच्या भेटी दरम्यान पंतप्रधान योजना तात्काळ मार्गी लावून सर्वसामान्य लोकांना योजानेचा लाभ उपलब्ध करुन देण्यांबाबत निवेदन दिले होते.
त्यातच वेळोवेळी मनपा धुळे च्या अधिकारीशी आणि माडाचे प्रमुख आधिकारी मोगडीकर यांच्याकडे सततचा पाठपुरावा सुरु ठेवला. अखेर त्यांची दखल घेत वांद्रे मुंबई येथील माडा आॕफिसातील प्रमुख आधिकारी मोगडीकर यांनी पंतप्रधान योजनेसाठी अर्ज केलेल्या लोकांचा प्रस्ताव घेवून जात दिल्लीतील आयोजित बैठकीत तब्बल २५० लाभार्थाचा डिपीआर क्र ३ मंजुर करून घेतला. त्याला आज चार ते पाच महिने होत असून योजनेला प्रारंभ होत नसल्यांचे पाहून पुन्हा मनपाशी संपर्क साधला असता निधी अभावी योजनेला सुरुवात करता येत नसल्यांचे सांगण्यांत आले मग पुन्हा माडाचे मोगडीकर साहेबांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की योजने सुरुवात करता येवू शकते. कारण २५० लाभार्थाचा डिपीआर क्र3 मंजुर आहे. त्यानंतर मनपाने माडाकडे योजनेसाठी लागणाऱ्या निधीबाबतचे पत्र पाठविले परंतु निधी मागणीबाबत पत्र गृहनिर्माण विभागाकडे म्हणजे शासनाकडे पाठाविले नसल्यांने निधी वितरीत झाला नसल्यांचे गृहविभागाकडून सांगण्यात आले.
याबाबत दि. २५ जानेवारी रोजी आयुक्त माननीय देविदास टेकाळे साहेब यांच्या निदर्शनास आणुन दिली. मनपाकडून शासनाकडे निधी मागणी बाबतचे पत्र पाठविले कि नाही यांचा तपास पुन्हा आज दि. २७ जानेवारी महासभा संपल्यानंतर माननीय आयुक्त देविदासजी टेकाळे यांना विचारले असता तेव्हा कुठे शासनाला निधी वितरीत करण्यांबाबत पत्र पाठविण्यांत संबंधीताना सांगितले. वरखेडे गावाचे पत्रकार तथा धुळे ग्रामीण वृत्तपत्राचे संपादक गजेंद्र नारायण पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत धुळे शहराचा २५० लाभार्थाचा DPR3 मंजुर झाला असून मात्र निधी अभावी सदर पंतप्रधान आवास योजनेचे काम बंद असल्यांचे दिसत होते. याबाबत वेळोवेळी संबंधीताशी संपर्क करत राहिलो आणी मग त्यांनी माडा विभाग वांद्रे येथे निधीबाबतचे पत्र पाठविले तरी सुध्दा योजनेला चालना मिळाली नसल्यांचे पाहून मंत्रालयात उपसचिव कनके यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणुन घेतली असता सदर योजनेला किती निधी लागणार याबाबतचे पत्र मनपाकडून शासनाकडे आले नसल्यांने निधी वितारीत झालेला नाही. म्हणुन मनपाने शासनाकडे निधीबाबतचे पत्र पाठविणे आवश्यक असल्यांचे माननीय उपसचिव कनके यांनी सांगितले. त्यामुळे आपण कार्यमग्न आयुक्त म्हणुन धुळे मनपाला लाभले आहेत. तरी या समस्येकडे जातीने लक्ष घालावे आणि न्याय मिळवून देण्यांचे सहकार्य करावे अशी विंनती गजेंद्र नारायण पाटील यांनी आयुक्त देविदास टेकाळे यांना केली आहे.