महाराष्ट्र
धुळे जिल्ह्याच्या विकासात्मक भाग्य उजळणार
धुळे (प्रतिनिधी) महत्वकांशी दिल्ली -मुंबई-इंडस्ट्रीअल कॉरिडॉर प्रकल्पाला चालना देण्यासाठी DMIC कार्यान्वित होण्याकरिता कोअर कमिटीच्या सदस्यांनी औरंगाबाद येथील ‘शेंदरा’ या समांतर ‘प्रकल्पाला नुकतीच भेट दिली.
केंद्र व राज्य सरकार यांनी २००८-०९ पासून केंद्र व राज्य शासन यांची प्राथमिक मंजुरी मिळालेली आहे. धुळे शहराला लागून १५ हजार एकर वर ३०० ते ३५० नवीन उद्योग, कारखाने, १ लाख तरुणांना नवीन नोकऱ्या, रोजगार उपलब्द होणार आहे. सदर प्रकल्पाला चालना देण्यासाठी कोअर कमिटी प्रवर्तक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रणजित राजे भोसले, MIDC चे अध्यक्ष नितीन बंग, सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अल्प.वि.चे प्रदेश उपाध्यक्ष रईस काझी, शहरातील उद्योजक, विविध पक्षाचे पदाधिकारी, सदस्य आदींनी भेट दिली.