महाराष्ट्र

आजचे राशिभविष्य, मंगळवार १२ एप्रिल २०२२ !

मेष:-
मुलांकडून चांगली बातमी मिळेल. दिवस खेळीमेळीत जाईल. संभाषण कौशल्य दाखवण्याचा योग्य येईल. कौटुंबिक सौख्यात रमून जाल. कामाच्या ठिकाणी प्रभुत्व राहील.

वृषभ:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. सुट्टीचे योग्य नियोजन कराल. विरोधकांवर लक्ष ठेवावे. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. घरगुती कामाचा ताण जाणवेल.

मिथुन:-
भावंडांची मदत घेता येईल. मित्रांच्या ओळखीचा फायदा घेता येईल. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. घराजवळील ठिकाणाला भेट द्याल. अधिकार्‍यांचे योग्य मार्गदर्शन लाभेल.

कर्क:-
कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्यावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामातून चांगला धनलाभ संभवतो. किरकोळ गैरसमज दूर सारावेत. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

सिंह:-
दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. क्षुल्लक अडचणीतून मार्ग निघेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. अपचनाचा त्रास जाणवेल.

कन्या:-
काही गोष्टींबद्दल ठामपणे निर्णय घ्यावेत. चांगली संगत लाभेल. धार्मिक कामात मन रमेल. दिवस ऐषारामात घालवाल. मनातील नसत्या चिंता काढून टाका.

तूळ:-
जुनी इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक गोष्टी चिघळू देवू नका. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. काही कामे विनासायास पार पडतील. जुगाराची आवड पूर्ण कराल.

वृश्चिक:-
हातातील अधिकार वापरावे लागतील. चालू कामात यश येईल. विरोधकांचा विरोध मावळेल अडचणीतून मार्ग काढता येईल. मानसिक समाधान शोधा.

धनू:-
आर्थिक नियोजनावर भर द्या. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात. सहकार्‍यांची उत्तम साथ मिळेल.

मकर:-
हातातील कामात किरकोळ अडचणी संभवतात. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. घरात काही किरकोळ बदल करा. जुने मित्र भेटतील. संपर्कातून सहवास वाढेल.

कुंभ:-
गरज नसेल तर प्रवास टाळावा. सामुदायिक वादात अडकू नका. खिशाला कात्री लागू शकते. जोडीदाराचे मत विचारात घ्या. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा.

मीन:-
जमिनीच्या कामातून लाभ मिळेल. हाताखालील लोकांकडून कामे योग्य वेळेत पार पडतील. तुमचा मान वाढेल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. कामातून समाधान मिळेल.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे