महाराष्ट्र

खरवड येथे गॅस शेगडीचे वितरण

बोरद (योगेश गोसावी) तळोदा तालुक्यातील खरवड येथे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजेंनेतर्गत गॅस शेगडीचे वाटप करण्यात आले.

केंद्र सरकार ने १ मे २०१६ रोजी या योजनेची घोषणा केली. महिलांना धुरापासून मुक्तता मिळावी हा या योजनेमागचा उद्देश असून केंद्र सरकार द्वरा आर्थिक गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येत आहे.

या योजनेचा हा दुसरा टप्पा असून एक कोटी नागरिकांना याचा लाभ दिला जाणार आहे. शहादा तळोदा विधानसभा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांनी सतत पाठ पुरावा करत मतदार संघात आर्थिक गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात येत आहे.

त्यानुसार तळोदा तालुक्यातील खरवड येथे ४० लाभार्थ्यांना गॅस शेगडीचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष चेतन गोसावी, भटू मराठे, राजेंद्र गोसावी, बबन भारती, शरद ठाकरे, सुनील गोसावी, धनराज मोरे, बळीराम पाडवी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे