बोदवड उपसा सिंचनच्या सातबाराच्या नोंदी कमी करा ; युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बोदवड (प्रतिनिधी) बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी बोदवड तालुक्यातील येवती जामठी लोणवाडी यातील गावातील शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर या योजनेसाठी नोंदी टाकण्यात आलेल्या आहेत या नोंदी करण्यात याव्या, अशी मागणी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उपसा सिंचन योजनेच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदी शेतकऱ्यांनी उतारावरील भूसंपादनाच्या नोंदी कमी करण्याबाबत बोदवड तहसील कार्यालयात तक्रार केली होती. तत्कालीन तहसीलदार आणि लोणवाडी येथील आठ ते दहा शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली काढली होती. उर्वरित प्रकरणे ३१ जानेवारी २०१९ रोजी जिल्हा उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात आली होती. अडीच वर्षे उलटूनही या प्रकरणावर कारवाई झालेली नाही. शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील बेकायदेशीर कमी करण्यात यावे व शेतकऱ्यांना न्याय मिळावा ,अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक हितेश पाटील, युवक कार्याध्यक्ष भूपेंद्र जाधव, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, दीपक शिंदे, गणेश मानकर, अल्पेश महाजन यांनी निवेदन दिले.
सातबारा उताऱ्यावर योजनेसाठी च्या नोंदी टाकण्यात आल्यामुळे शेतकर्यांना अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी मागणीची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीवर प्रशासनाने पुढील उपाय योजना करावी अशी मागणी आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा देखील सुरू आहे.