जिल्हास्तरीय आरोग्य समितीवर डाँ. रविंद्र महाजन यांची निवड
मोताळा (मिलींद बोदडे) मोताळा येथे रुग्न सेवेच्या माध्यमातुन अगदी गोरगरीबांना वैद्यकिय सेवा देणारे मोताळ्यात च नव्हे तर संपुर्ण बुलढाणा जिल्ह्यात सुपरिचीत असलेले डाँ रविंद्र महाजन यांची जिल्हा आरोग्य समन्वय समितीवर डाँ राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य म्हनुन निवड करण्यात आली आहे.
समितीचे सदस्य जिल्हाअधिकारी एस रामामुर्ती यांच्या स्वाक्षरीने अशासकिय सदस्य म्हनुन डाँ रविंद्र महाजन यांची निवड करण्यात आली आहे. पत्रात नमुद आहे कि, अन्न व औषध प्रशासन तथा जिल्हा पालक मंत्री डाँ राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आरोग्य सेवा समितीची रचना असुन या समितीच्या माध्यमातुन अशासकिय सदस्य म्हनुन खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार, जिल्हाअधिकारी एस रामामुर्ती, मलकापुर विधानसभेचे आमदार राजेश एकडे, बुलढाणा विधानसधभेचे आमदार संजय गायकवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा शल्य चिकीत्सक निवी तडस यांच्या सह जिल्ह्यातील विवीध अधिकारी व डाँक्टर यांची जिल्हा आपोग्य सेवासमन्वय समितीतीत निवड करण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य सेवा समितीत डाँ रविंद्र महाजन यांची अशासकिय निवडीमुळे त्याच्या चाहत्याकडुन शुभेच्छेचा वर्षाव होत आहे. मोताळा शहरातील नागरीकांना आरोग्य उपयोगी योजनेचा लाभ अधिकाधिक मिळवुन देण्याचा प्रयत्न करीन, अशी प्रतिक्रिया डाँ रविंद्र महाजन यांनी दिली आहे.