मोताळा तालुक्यातील शेलापुर बु येथील मुलीची आत्महत्या
मोताळा (मिलींद बोदडे) मोताळा तालुक्यातील शेलापुर बु येथील उखर्डा चिम या शेतमजुराची एकुलती एक मुलगी कु शुभांगी चीम हिने आत्महत्या केल्याचे उघडकिस आले. शुभांगीचे १० फेब्रुवारी रोजी लग्न ठरले होते.
प्राप्त माहीती नुसार शेलापुर बु येथील २३ वर्षीय शुभांगी हिचे लग्न ठरले होते. लग्नाच्या पत्रीका गावकरी व नातेवाईक यांना पाठविण्यात आली होती. लग्नाची घाईगरबड सुरु असतांना परंतु रविवारी ३० जानेवारी रोजी अचानक कु शुभांगी हिने दुपारी २ वाजेच्या सुमारास सुरज दिनकर पाटील यांच्या शेतातील विहरी मध्ये उडी घेउन जिवन यात्रा संपवली. चिम कुटुबिंयावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेची माहीती पोलीस पाटील गजानन भोपळे यांनी पोलीस स्टेशनला कळविले व त्या ठिकाणी ठाणे अमलदार प्रल्हाद वानखेडे व ज्ञानेश्वर धामोडे यांनी येवुन घटनास्थळी पंचनामा करुन प्रेत बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी मलकापुर येथे पाठविण्यात आले. आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत समजु शकले नाही. पुढील तपास ठाणे अमलदार प्रल्हाद वानखेडे व ज्ञानेश्वर धामोडे करत आहे.