शिंदखेडा येथील पं.स.च्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे कुलूप तोडून एक लाखाचे लॅप टॉप लंपास !
एका वर्षात दुसऱ्यांदा चोरी, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह !
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे कुलूप दि. १७ मार्च च्या रात्री ते 21 मार्च दरम्यान पंचायत समिती च्या आवारातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे कुलूप तोडून गोदरेज कपाट फोडून त्यात ठेवलेले दोन लॅपटॉप रु 113860 व हार्ड डिक्स रु 5000 असे एकूण 1लाख 18 हजार 830 रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे तक्रार गटशिक्षणाधिकारी डाॅ. सी. के. पाटील यांनी शिंदखेडा पोलिसात दिली आहे.
या कार्यालयात दुसऱ्यांदा चोरी होत असून गेल्या मार्च महिन्यात चोरटयांनी काँप्युटर व प्रिंटर असे 50 हजाराचे चोरून नेले होते. त्याचा ही तपास अद्याप लागला नाही तोवर ही दुसऱ्यांदा चोरी झाली आहे. लॅपटाॅप सोबत हार्डडिस्क ही चोरीला गेली आहे. त्यात महत्त्व पुर्ण शालेय डाटा असल्याने पंचायित झाली आहे. असे गटशिक्षणाधिकारी पाटील म्हणाले. यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.