मालपुर येथे नवीन दलित वस्ती रस्ता तयार करण्यात बाबत निवेदन देऊनही ग्रामपंचायत चे दुर्लक्ष.
दिनांक:२३ जुलै २०२२
मालपुर प्रतिनिधि- गोपाल कोळी
मालपुर.ता.शिंदखेडा.जि.धुळे येथे अमरावती काॅलनी मधिल नविन दलित वस्ती उभारण्यात आली आहे. परंतु येथे रस्त्यांची अवस्था फार खराब झाली आहे पायी ये जा करणाऱ्यांना सुध्दा कठीण झाले आहे. प्ररशासना कडुन रस्ता मंजुरी करून देण्यात यावे जेणेकरून लहान लहान मुलांना सकाळी शाळेत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही कारण रोड नाही व जे रस्त्यावरती पाणी साचले आहे त्यांचे निराकरण करून मुरूम टाकून त्यावर काहितरी उपाय काढावा कारण नागरिकाना मोठी अडचणी चे सामना करावा लागत आहे.असे निवेदन मालपुर येथील अमरावती कॅालनीचे स्थानिकांनी केले आहे.
वारंवार ग्रामपंचायतील सरपंच उपसरपंच सदस्य यांना निवेदन देऊन किंवा सांगुन सुध्दा समस्या सुटत नसतील तर आम्हाला ग्रामपंचायत कार्यालय येथे उपोषण ला बसावे लागले असा इशारा नरेश सपकाळे, प्रभाकर इंदवे, गिताबाई मालचे, दिनेश इंदवे, राजेंद्र पानपाटिल, प्रकाश राजु इंदवे, रविंद्र बुधा सौंदाणे, परशुराम भिल, विकास आखाडे, व दलित वस्तीत राहणारे नागरिकांनी दिले आहे.