भारताचे प्रथम आदिवासी महिला राष्ट्रपती निवडुन आल्या बद्दल धारणी शहरात भाजपा ची भव्य रॅली.
भारतीय जनता पार्टी धारणी तालुक्याचे अध्यक्ष हिरालालजी मावस्कर यांचे नेतृत्वात रैली संपन्न.
दिनांक: २३ जुलै २०२२
धारणी प्रतिनिधि- पंकज मालवीय
धारणी: भारतीय जनता पार्टी धारणी तालुक्याचे अध्यक्ष हिरालालजी मावस्कर यांचे नेतृत्वात भारताचे प्रथम आदिवासी महिला महामहिम द्रोपती मूर्मु यांची राष्ट्रपती पदी निवड झाल्याने आदिवासी समाजात देशात ७५ व्या वर्धापन दिवस गौरन्वित केल्या बद्दल पंतप्रधान नरेंन्द्र मोदी व महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुुुुुुर्मू यांचे अभिनंदन करण्यासाठी धारणी शहरात भव्य विजयी रॅली काढण्यात आली .सदर कार्यक्रमात धारणी तालुका भाजपाचे माजी ता.अ. सुभाषजी गुप्ता, सदाशिवजी खडके,महासचिव सुनिल लखपती, जेष्ठ नेता रामदासजी नालमवार,नगर सेविका क्षमाताई चौकसे,श्रीमती संगीताताई खार्वे,सचिव मनिष पांडे , सचिव तुलसिराम बेठेकर,सचिव रामकृष्ण सोनोने , सचिव सुन्दरलाल पोटेकर,डॉ.गणेश पांडे, शहर अध्यक्ष गुप्ता,उपाध्यक्ष गायन,तिलक पटेल,तारासिंग जावरकर,सुधाकरजी फकडे,गोपाल राठोड , श्रीमती मालती कारदेकर , दिपक नागले , इत्यादी शेकडो भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते . सदर कार्यक्रम मधुवा पुला वरून सुरु करुन जयस्तंभ चौक मध्ये समारोह करण्यात आला .सदर कार्यक्रमाला संबोधित करतांना हिरालालजी मावस्कर यांनी म्हटले की , आमच्या आदिवासी साठी ही गौरवाची बाब असुन आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की ,सर्वोच्च पदावर महामहिम राष्ट्रपती म्हणुन एका आदिवासी महिलेची निवड झाली .