विनायक सहकारी साखर कारखाना चालू करा ; शेतकऱ्यांची मागणी
वैजापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील ऊस लागवड शेतकऱ्यांना वाली कोण? ऊस लागवड शेतकऱ्याची व्यथा सहकारी कारखाना मृतावस्थेत गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात पाऊस भरपूर असून सुद्धा शेतकरी ऊस लागवडी पासून वंचित काही शेतकऱ्यांनी ऊस लागवड करून सुद्धा नोंदणी केलेले कारखाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. ऊस तुटत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
लाखो रुपये खर्च करून ऊस पिकवला. पण त्याला आता तोड मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. म्हणून बेंदवाडी परसोडा शिवराई बोरसर पानगव्हाण येथील शेतकऱ्यांची मागणी आहे की, विनायक सहकारी कारखाना मृत अवस्थेतून काढून शेतकऱ्यांचा स्वाधीन करावा नाहीतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपली जमीन विकून उदाहरण निर्वाह करावा लागेल. ऊस तोड कामगार यांना १० हजार रुपये देऊन सुद्धा तोडून मिळत नाही. त्याचप्रमाणे शेजारील तालुक्यातील कारखाने कवडीमोल भावाने ऊस मागत आहे तरी शेतकऱ्यांनी विनायक सहकारी साखर कारखाना चालू करावी अशी मागणी केली आहे.