महाराष्ट्र
‘त्या’ जाधव कुटुंबियांना शासन स्तरावरून मदत देणार ; आमदारांनी दिली ग्वाही
मगरवाडी (वैजीनाथ धेडे) मोहोळ मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील युवा शेतकरी सूरज रामचंद्र जाधव यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्या जाधव कुंटुंबाची आमदार यशवंत(तात्या)माने, मोहोळ पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी सांत्वन पर भेट घेतली. लवकरात लवकर शासन स्तरावरून मदत देण्याची ग्वाही यावेळी आमदार यांनी जाधव कुंटुंबीयाला दिली आहे.
यावेळी प्रांतधिकारी गजानन गुरव,तहसीलदार सुशील बेल्हेकर, पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन सावंत, सरपंच राजेंद्र देवडकर, तानाजी पवार, शिवाजी सावंत डॉ दत्तात्रय माने, पत्रकार विठ्ठल जाधव, शितल रेवडकर, बाबासाहेब बोंबाळे, विजय पवार ग्रामसेवक एस आर फडतरे, वडील रामचंद्र जाधव, शिवाजी जाधवसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.