महाराष्ट्र
वरूड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
वरुड : शहरात भारत रत्नं डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ज्यांच्या संविधानावर संपूर्ण भारत देश चालतो. असे महामानव आपल्या देशाचा आभिमान विश्वरत्नं डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने वरुड शहरातील बाबासाहेब यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे, भाजपचे वरुड शहर डॉ. निलेश बेलसरे, शे.घाट शहर अध्यक्ष निलेश फुटाणे, भाजपचे युवा मोर्चा नितीन गुजर व भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आंबेडकर चौक वरुड येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.