भुसावळ तालुका पोलिस स्टेशन हद्दीत उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाची धडक कार्यवाही
भुसावळ (ओमशंकर रायकवार) भुसावळ येथे धुलिवंदनाच्या दिवशी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी सेकम शिवारातील नॅशनल हायवे क्रमांक ६ लगत असलेल्या फौजी धाबा येथे अवैध रित्या देशी- विदेशी मद्य विक्री होत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती.

त्या आधारे त्यांनी त्यांच्या कार्यालयातील महिला पोलीस निरीक्षक महिला पोलीस निरीक्षक चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, सहाय्यक पोलिस निरिक्षक शांताराम चौधरी,पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदकिशोर सोनवणे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल वलके,अश्विनी जोगी यांना रेड करणे कामी रवाना केले होते..उपरोक्त पथकाने सदर ठिकाणी रेड केली असता या हॉटेलमध्ये देशी- विदेशी मद्याच्या सुमारे १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्यावरून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर ३५/२०२२, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ खाली हॉटेल चे चालक नामे संदीप ज्ञानेश्वर भोई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वानखेडे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हे करत आहे.



