रविन्द्र खरात उर्फ हंप्या हत्याकांडचा मुख्य आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी केले अटक !
नाशिक (प्रतिनिधी) दि. ७ आँक्टोबर २०१९ मध्ये भुसावळ नगरपालिकेतील भाजपा नगरसेवक रविन्द्र खरात उर्फ हंप्या व त्यांच्या परिवारातील चौघ्यांचा गोळ्याझाडून खून करण्यात आले होते व हे हत्याकांड संपूर्ण महाराष्ट्रासह संसदभवन पर्यंत गाजलेला होता.
या हत्याकांड मागील तीन पैकी दोन आरोपींनी पोलिसांसमोर दोन दिवसानंतर आस्मसमर्ण केले होते व मुख्य मारेकरी अरबाज उर्फ गोलू खान फरार असुन पोलिस तीन वर्षापासुन त्याचा शोध घेण्यासाठी धागे दोरे लावत होती. सराईत गुन्हेगार असलेला अरबाज उर्फ गोलू खान हा दि.०५ रोजी नाशिक कारागृहात असलेल्या गुन्हेगारांना भेटण्यासाठी आल्याची गुप्त माहिती नाशिक रोड पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला शिताफितीने अटक केली. सदर कार्यवाही वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्गनाखाली त्यांचे सहकारी विशाल पाटील, विष्णु पाटील, विष्णु गोसावी, मनोहर शिंदे, राकेश बोडके, सोमनाथ जाधव , कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे, यांच्या पथकाने केली.