जी.एच.रायसोनी इंस्टिट्यूट आँफ बिज़नस मैनेजमेंटच्या एमबीए फर्स्ट ईयरचे विद्यार्थ्यांनी केले सुरक्षा कायदा व राहदारी नियमांवर लाईव प्रोजेक्ट
भुसावळ (प्रतिनिधी) दोन वर्षापासुन कोरोना पार्श्वभूमि वर सर्वत्र शाळा व कॅालेज चे आनलाईन शिक्षण सुरु असुन बिज़नस मैनेजमेंट शिकणारे विद्यार्थीगण लाईव प्रोजेक्ट पासुन वंचित होते. यंदा कोरोना महामारीचे थैमान कमी झाल्याने महाराष्ट्र शिक्षण विभागाने कॅालेज आँफलाईन सुरु केले आहे. व त्या अनुषंगाने जळगाव येथील जी.एच.रायसोनी इंस्टिट्यूट आँफ बिज़नस मैनेजमेंट जळगांव चे एमबीए फायनान्स फर्स्ट ईयर चे विद्यार्थ्यांनी प्रो.राजकुमार कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली काल भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनात भेट देऊन सुरक्षा कायदा? एफआईआर म्हणजे काय? व एफआईआर कशी दाखल करावेत? राहदारींचे नियम या बाबत पोलिसांची चर्चा करुन लाईव प्रोजेक्ट पूर्ण केले.
तसेच संपूर्ण कोरोना काळात पोलिसांनी केलेले उत्कृष्ट कार्यासाठी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत ही केले. लाईव प्रोजेक्ट केल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व उत्साह वाढतो अशी माहिती विद्यार्थी हर्षल भोळे याने बोलतांना दिली.