ग्रुप ग्रामपंचायत कळगाव ग्रामसेवकाकडून माहितीच्या अधिकारातंर्गत माहिती देण्यास टाळाटाळ
शहापुर (देविदास भोईर) ग्रुप ग्रामपंचायत कळगाव येथील जनमाहिती अधिकारी दिनेश ठाकरे (ग्रामसेवक) यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुका अध्यक्ष भावेश ठाकरे यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागवली असता कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. यासंदर्भात प्रथम अपील अंतर्गत अपूर्ण आणि असमाधानकारक माहिती दिली व जाणूनबुजून विलंब करून पळ काढला.
तसेच माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप तक्रारकर्ता भावेश ठाकरे यांनी केला व माहिती न देणाऱ्या ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कार्यवाही करून मागितलेल्या माहितीची विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास 1) दप्तर दिरंगाई कायदा २००५ नुसार, 2)सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक क्र.केमाअर्ज-२००७/७४/प्र.क्र. १५४/०७/०६दिनांक- ३१/०३/२००८ मधील परिच्छेद ४ नुसार, 3)महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९.नुसार, कार्यवाही करण्याची मागणी विभागीय आयुक्तांना व जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारीतून केली असता त्यान्नी पंचायत समितीला चौकशी करून जनमाहिती अधिकारी (ग्रामसेवक) दोषी आढळल्यास कार्यवाही करण्याचे आदेश दिले असता पंचायत समितीच्या प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांनी मात्र, जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती पुरवली असल्याचे म्हणत त्याची पाठराखण केली आहे. असमाधानकारक उत्तरं व अपूर्ण मिळालेली माहिती यावर तक्रारदार यांनी नाराजी व्यक्त करत ग्रामसेवक व प्रथम अपिलीय अधिकारी यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाले असल्यामुळे पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय अर्जदाराने व्यक्त केला आहे. तसा पत्रव्यवहार अर्जदाराने प्रथम अपिलीय अधिकारी यांच्यासोबत केला असून समाधान न झालस द्वितीय आफिल करणार असल्याचे सांगितले आहे.