बोरद (योगेश गोसावी) तळोदा तालुक्यातील बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रात ६० वर्षांवरील नागरिकांचे ८०% लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा धोका कमी झाला असून राज्य सरकार ने निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र कोरोनाचे संकट पुन्हा येवू नये यासाठी १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे.
त्यातच बोरद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातूनही लसीकरण वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या त्यांच्या प्रयत्नांमुळेच वयोवृध्द म्हणजेच ६० वर्षांवरील नागरिकांचे ८०% लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यातच मात्र १२ ते १४ व १५ ते १८ वयोगटातील मुलांचेही लसीकरण ही सुरू असून त्याला मात्र बोरद परिसरात पालकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांचे अवघे ३०% लसीकरण आता पर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. तसेच १५ ते १८ वयोगट असलेल्या मुलांचे ही ३०% लसीकरण पूर्ण झाले आहे.
१२ ते १४ व १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असून १०० टक्के लसीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बोरद सह परिसरातील ६० वर्षांवरील नागरिक तसेच १२ ते १४ व १५ ते १८ वयोगटातील मुलांचे पालकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन बोरद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अरुण लांडगे यांनी केले आहे.