धारणी तहसीलमध्ये लाईनच्या लोड सेटिंगमुळे समस्या ; लोकांच्या आरोप
धारणी (इंद्रकुमार राजनकर) दुर्गम आदिवासी एरियात लोड सेटिंगच्या नावावर दिवसभर बती गुल लाईन नसल्यामुळे अनेक गावात पिण्याचे पाणी येत नाही. आरोग्यसेवामध्ये अडथळे, बँकेच्या कामात बाधा, मीटर बिल खूप येत आहे. लोकांचे घरी एक लाईट किंवा टीव्ही यापेक्षा हे लोक काही जास्त वापर करत नाही. प्रत्येकाच्या घरी टीव्ही पण नाही तरी बिल जास्त येण्याचे कारण काय ? असा आता प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो आहे.
बिल जास्त आल्यावर लोक टाइमवर बिल भरण होत नाही. आणि हे विद्युत कर्मचारी वायर कापून किंवा मीटर घेऊन जातात. गोरगरीब लोक करणार काय ? असाही लोकांच्या प्रश्न समोर आहे. असे कित्येक लाईनच्या कारणामुळे अडथळे येत आहे. दोन किंवा तीन तासाची लोड सेटिंग असून दिवसभर लाईट बरोबर येत नाही. रात्री आली तरी लाईट बरोबर राहत नाही. तपत्या उन्हाळ्यात अशी सेवा विद्युत विभाग देत आहे. हरिसाल या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथे लाईनची दुर्दशा होत आहे. लाईट जरी आली तर होल्टेज पण असते पाण्याची टंचाई वाढत चालले आहे. दुर्गम आदिवासी एरियात विद्युत विभाग किंवा शासनाने लक्ष देण्याची अति गरजेचे आहे.