महाराष्ट्र

पहूर येथील शिक्षक शंकर भामेरे यांचे ‘समतेचे शिलेदार’ पुस्तक प्रकाशित

जामनेर (ईश्वर चौधरी) तालुक्यातील पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तसेच पत्रकार शंकर रंगनाथ भामेरे यांच्या ‘समतेचे शिलेदार’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले.

समतावादी साहित्य शिक्षक मंडळातर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात १४ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, प्रशांत प्रकाशनचे संचालक प्रदीप पाटील, समतावादी साहित्य शिक्षक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ, समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. ‘समतेचे शिलेदार’ ही शंकर भामेरे यांची पहिलीच लेखन कृती असून जळगाव येथील प्रशांत पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगावर युद्धाचे सावट पसरले असून अशा युद्धजन्य परिस्थितीत समतावादी विचारच जगाला तारू शकतात. या विषयीचे विवेचन या पुस्तकात आढळते. समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी सर्वसंग परित्याग केलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध, वर्धमान महाविर यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंतच्या समतेच्या शिलेदारांच्या कार्याची थोरवी या पुस्तकात वर्णिली आहे. जळगाव येथील एस.एस.बी.टी इंजिनिअरिंग कॉलेजात झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. व्ही. घोंगडे, के. ए. बनकर, हरीभाऊ राऊत, किर्ती घोंगडे, अॅड . एन. एस. महाजन, शांतीलाल उबाळे, निलेश सोनार आदींची उपस्थिती होती. शंकर भामेरे यांच्या या यशाबद्दल त्यांचे महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष एस. व्ही. गीते यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे