पेटत्या उसाच्या शेतात शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
शहादा : शहादा तालुक्यातील बामखेडा त.त येथील शेतकरी संजय एकनाथ चौधरी (वय ५८) यांचे पेटत्या उसाच्या शेतात होरपळून मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बामखेडा गावालगत अंकलेश्वर बराणपुर रोडालगत पूर्वेस संजय एकनाथ चौधरी यांचे शेत आहे. संजय चौधरी हे आपल्या शेतात काम करीत असताना दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान त्यांना देविदास ऊखा पटेल यांच्या शेतातील ऊस शॉर्ट सर्किटमुळे पेटताना दिसला उसाच्या शेतालगत त्यांचा कापणी वर आलेला गहू पेटुन जाईल म्हणून त्यांनी उसाचे शेत त्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच त्यांचा होरपळून (जळुन)मृत्यू झाला.
सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, उपनिरीक्षक भगवान कोळी, पोलीस कॉन्स्टेबल माळी आदींनी पंचनामा केला. सारंगखेडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यासाठी मयताचे मोठे बंधू रोहिदास एकनाथ चौधरी फिर्याद देण्याचे काम सुरू होते. यावेळेस गावातील सरपंच मनोज चौधरी, पोलीस पाटील योगेश चौधरी, किरण सोनार, संजय सोनवणे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.