महाराष्ट्रराजकीय

साक्रीत ४० वर्षानंतर सत्तापरिवर्तन ; नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा ११ जागांवर विजय

शिवसेना, राष्ट्रवादी ४ तर काँग्रेसला एक जागा एका पक्षाचा विजय

साक्री (प्रतिनिधी) संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या साक्री नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पार पडून सुमारे ३५ ते ४० वर्षापासून सत्तेत असलेल्या ज्ञानेश्वर तथा नानासाहेब नागरे यांच्या गटाला हादरा बसला असून त्यांच्या शिवसेना राष्ट्रवादी च्या फक्त चार जागा निवडून आले आहेत. भारतीय जनता पार्टीने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवून सत्तेकडे वाटचाल केलेली आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये एका स्वतंत्र अपक्ष उमेदवाराने आश्चर्यकारकरीत्या बाजी मारली असून वार्ड क्रमांक १६ मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय झाले आहेत.

निकालाविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

प्रभाग क्रमांक १ मध्ये अपक्ष उमेदवार कल्पना राजेंद्र खैरनार या २४४ मतांनी विजय झाले आहेत. त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा विजय भामरे यांना २०० तर माजी नगरसेविका व भाजपाचे उमेदवार पुनम जगदीश शिंदे १६९ मते पडली आहेत.

प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपाच्या संगीता बाबूलाल भावसार ४०० मते मिळवून विजय झाले आहेत त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती नितीन बेडसे यांना ३६३ मते मिळाली आहेत.

प्रभाग क्रमांक ३ हा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित होता. सदर प्रभागात भाजपाच्या उषाबाई अनिल पवार यांना ४९९ मते मिळून त्यांचा विजय झाल्या आहे. त्यांच्याविरोधातील शिवसेनेच्या उषा दिलीप बहिरम यांना ४७७ मते मिळून त्यांचा पराभव झाला आहे.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये अनुसूचित जमाती आरक्षित होता. यात भाजपाचे प्रवीण राजेंद्र निकुंभे यांना ३८८ मते मिळून त्यांचा विजय झाला आहे. त्यांच्याविरोधातील काँग्रेसचे दशरथ रंगनाथ भवरे यांना फक्त ९ मते तर शिवसेनेचे भूषण अतुल महाले यांना ३६५ मते पडली असून दोघे पराभूत झाले आहेत.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपाच्या मनीषा महेंद्र देसले ५६५ मते मिळून विजय झाले आहेत तर त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीच्या पूजा जितेंद्र मराठे यांना २६१ मध्ये घेत पराभव पत्करावा लागला आहे. नोटा २ विजयी उमेदवार मनीषा महिंद्र देसले या भाजपचे गेल्या अनेक वर्षापासून असे सक्रिय कार्यकर्ते महेंद्र अर्थात बबलू देसले यांच्या पत्नी असून पराभुत पूजा मराठे या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या पत्नी आहेत.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपाच्या सौ रेखा आबासाहेब सोनवणे या ४२७ मते मिळून विजय झाले आहेत त्यांच्याविरोधातील अपक्ष उमेदवार निकिता भालचंद्र चव्हाण यांना फक्त पाच काँग्रेसच्या तनिषा दिनेश नेरकर यांना १८ तर शिवसेनेच्या चित्रा पंढरीनाथ ठाकरे यांना ४०८ मते मिळून तिघांचा पराभूत झाला आहे. नोटा ५ विजयी उमेदवार सौ रेखा सोनवणे या पत्रकार आबासाहेब सोनवणे यांच्या अर्धांगिनी आहेत.

प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिवसेनेच्या सौ सोनल सुमित नागरे या २९६ मते मिळवून विजय झाले आहेत. त्यांच्याविरोधातील भाजपाच्या संगीता सुहास चालसे यांना २२८ तर काँग्रेसच्या जोशीला अमरचंद पगारिया यांना २३ व अपक्ष उमेदवार कोमल हिम्मत सोनवणे यांना फक्त तीन मते मिळाली आहेत. नोटा तीन विजयी उमेदवार सोनल नागरे या नानासाहेब नागरे यांच्या सुनबाई व वार्ड क्रमांक ९ मधील विजयी उमेदवार सुमित अर्थात जयूअण्णा नागरे यांच्या पत्नी आहेत.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपाच्या जयश्री हेमंत पवार यांना ४०४ मते मिळून त्या विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधातील काँग्रेसच्या गुंताबाई दामू बागुल यांना २५ तर शिवसेनेच्या उषा सुभाष सोनवणे यांना २३१ मते मिळून त्यांचा पराभव झाला आहे. नोटा १२ विजयी उमेदवार सौ जयश्री पवार या न्यू इंग्लिश स्कूलमधील चित्रकला शिक्षक व भाजपाचे कार्यकर्ते हेमंत पवार यांच्या अर्धांगिनी आहेत.

प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेनेचे सुमित ज्ञानेश्वर नागरे अर्थात जयू अण्णा नागरे यांना ५३३ मते मिळून ते विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधातील काँग्रेसच्या तनिषा दिनेश नेरकर यांना फक्त अकरा व भाजपाचे पंकज गिरधर हिरे यांना २४३ मध्ये मिळून दोघांचा पराभव झाला आहे नोटा एक सुमित अर्थात जयू अण्णा नागरे हे नानासाहेब तथा ज्ञानेश्वर नागरे चिरंजीव असून प्रभाग क्रमांक ७ मधील विजयी उमेदवार माजी नगराध्यक्ष सोनल सुमित नागरे यांचे पती आहेत.

प्रभाग क्रमांक १० मधून शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पंकज पंढरीनाथ अहिरराव पिंटूदादा मराठे ६०४ मते घेऊन विजय झाले आहेत. त्यांच्याविरोधातील भाजपाचे प्रमोद मानसिंग राठोड यांना १४४ मते मिळून ते पराभूत झाले आहेत.

प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपाच्या सौ उज्वला विजय भोसले या ४०५ मते घेऊन विजय झाले आहेत. तर त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीच्या ताराबाई राजेंद्र जगताप यांना १९१ व काँग्रेसच्या कल्पना जयवंत शिंदे यांना २९ मते मिळाले आहेत. नोटा ५ विजयी उमेदवार उज्वला विजय भोसले या भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते व पत्रकार विजय भोसले यांच्या अर्धांगिनी आहेत.

प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपाच्या जयश्री विनोद पगारिया या ३४६ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधातील काँग्रेसच्या माधुरी संदीप खैरनार यांना फक्त ११ शिवसेनेच्या मंगल रामभाऊ भिल यांना १९८ मते मिळून दोघांचा पराभव झाला आहे. नोटा 14 विजयी उमेदवार जयश्री विनोद पगारिया या स्वर्गीय सुवालाल सेठ पगारिया यांच्या सुनबाई व भाजपाचे शहराध्यक्ष तुलसी मेडिकल ग्रुपचे विनोद पगारिया यांच्या अर्धांगिनी आहेत.

प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेनेचे राहुल अरविंद भोसले यांना ४६४ मते मिळून ते विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधातील भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र भगवान आजगे यांना २४७ मते मिळून त्यांचा पराभव झाला आहे. नोटा सहा विजयी उमेदवार राहुल भोसले हे शहरातील ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष अरविंद भाऊ भोसले यांचे चिरंजीव आहेत.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपाचे एडवोकेट गजेंद्र रामराव भोसले ४६० मते घेऊन विजय झाले आहेत. त्यांच्या विरोधातील शिवसेनेचे प्रमोद भटू येवले यांना ३७१ तर काँग्रेसच्या अनिता राजेंद्र रामोळे यांना ११७ मध्ये मिळाले आहेत नोटा सहा

प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपाचे दीपक दिलीप वाघ यांना ४०४ मते मिळून ते विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधातील काँग्रेसचे कमलाकर मोहिते यांना ६० तर शिवसेनेचे सतीश भीमराव मोहिते यांना १५२ मते मिळाली आहेत नोटा चार

प्रभाग क्रमांक १६ मध्ये काँग्रेसच्या नरगिसबी याकूबखा पठाण या २२४ मते घेऊन विजय झाले आहेत त्यांच्याविरोधातील भाजपाच्या भाग्य योगेश चौधरी यांना ४८ अपक्ष उमेदवार मुमताज इसाखा पठाण यांना १२१ तर शिवसेनेच्या शेख हूर बानो नासिर शेख यांना २१३ मते मिळाली आहेत नोटा ७ विजयी उमेदवार नरगिसबी पठाण या खानदेश प्रोव्हिजन ग्रुपचे याकूब दादा पठाण त्यांच्या अर्धांगिनी आहेत.

प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजपाचे बापूसाहेब पुंडलिक गीते २८७ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधातील काँग्रेसचे नदीमखान याकुबखान पठाण यांना २१० शिवसेनेचे भटू दिलावर पिंजारी यांना २१२ तर अपक्ष उमेदवार प्रकाश बंडू रामुळे यांना २५ मते मिळाली आहेत. नोटा तीन विजयी उमेदवार बापूसाहेब गीते हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे