हुतात्मा शिरीषकुमार जयंतीनिमित्त अभिवादन
नंदुरबार (प्रतिनिधी) स्वातंत्र्यपूर्व काळात नंदुरबार शहरात जुलमी ब्रिटिश शासनाची लढा देऊन शहीद झालेले हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त मंगळवारी प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले. शहरातील बालवीर चौक, नवा भोई वाडा परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे मंगळवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.
याप्रसंगी सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक यांच्या हस्ते शिरीष कुमार मेहता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नंदुरबार तालुका सचिव डॉ. गणेश ढोले यांनी पुष्पार्पण केले. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी सांगितले की, बालवीर शिरीषकुमार मेहता यांचा जन्म २८ डिसेंबर १९२६ रोजी नंदनगरीत झाला. शालेय जीवनात देशप्रेमाची ओढ असल्याने इंग्रजांना चले जावचा इशारा देत ९ सप्टेंबर १९४२ रोजी बाल सवंगड्यांसोबत शहीद झाले. त्यानंतर नंदुरबारचे नाव देशात अजरामर झाले.जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमास महादू हिरणवाळे, प्रफुल्ल राजपूत, दिलीप कुंभार, अरविंद खेडकर, प्रा. एकनाथ हिरणवाळे, तेजस घटी, विशाल हिरणवाळे, राजेंद्र सोनवणे तसेच शालेय विद्यार्थी दिव्या गवळी, भूमी गवळी, ज्योती गवळी, धिरेन हिरणवाळे, कृष्णा गवळी, प्रणव गवळी, राज घुगरे, आदित्य गवळी, वेदांत गवळी, कृष्णा चौधरी आदी उपस्थित होते.