शिरसाळा मारुतीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात सारोळा- माळेगांव दरम्यान मोठा अपघात.
बऱ्हाणपूर येथील भाविकांवर गंभीर दु:खापात.
दिनांक: २१ जानेवारी २०२३
प्रतिनिधी : बोदवड.
बोदवड तालुक्यातील विख्यात प्रसिद्धी मिळालेल्या शिरसाळा मारुती मंदिर म्हणजेच़ भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे मारुतीराया. प्रत्येक शनिवारी व मंगळवारी मारुतीराया चे दर्शनासाठी ह्या मंदिरात भाविकांची प्रचंडगर्दी उमळते लांबून लांबून भाविकदर्शनासाठी येथे येतात आणि मारुतीराया अनेकांची मनोकामना पूर्ण ही करतात. परंतु काळापुढे कधी कधी देव ही झुकतो. आणि नाईलाजाने भाविकांवर दु:खाचे डोंगर ही कोसळतात असेच़ दु:खाचे डोंगर बऱ्हाणपूर येथील मनोज ठाकुर आणि मोहित महाजन ह्या दोघांवर कोसळले आहे.
जाहिरात: https://youtu.be/Im-fp1FoCOU
सविस्तार वृत्त असे कि, बऱ्हाणपूर येथील मनोज प्रमोद ठाकुर उ.२० व.आणि मोहित गणेश महाजन उ.१९व. हे दोघे जण आज पहाटे दुचाकीवर बऱ्हाणपूर येथून शिरसाळा मारुती चे दर्शनासाठी आले होते व दर्शनानंतर परतीचाप्रवासा दरम्यान पहाटे ४:०० वाजे सुमारास सारोळा- माळेगांव दरम्यान वळण रस्तावर अज्ञात बोलेरो चारचाकी ने कट मारल्याने मोठा अपघात झाला. सदर अपघातात मनोज प्रमोद ठाकुर उ. २० व.रा. बऱ्हाणपूर किरकोळ तर मोहित गणेश महाजन उ.१९व. रा. बऱ्हाणपूर याचा पाय घुडग्यापासुन तुटुन गंभीर दु:खापात झाली. मुक्ताईनगर पोलिसांना माहिती मिळताच पो.काँ. मोहित गणेश मनुरे, पो.काँ. धर्मेंद्र ठाकुर यांनी तसेच़ मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य सेवक प्रदीप काळे यांनी रुग्णवाहिका व चालक रवि जंगले सह घटनास्थळी धाव घेतली.दोघे जखमींना उपचारासाठी मुक्ताईनगर उपजिल्हारुग्णालयात आणले असता जखमी मोहित याचा तुटलेला पाय पिशवीत टाकून आणावा लागला अशी माहिती रुग्णवाहिका चालक रवि जंगले यांनी दिली.जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात डाॅ. शोएब खान, डाॅ.प्रशांत रामवंशी व आरोग्य सेवक प्रदीप काळे परिसेविका कल्पना नगरे,सुनिता कसबे आदींनी तत्काळ उपचार केले. नंतर दोघांना नातेवाईकांच्या संमतीने पुढील उपचारासाठी बऱ्हाणपूर येथे हलविण्यात आला. सदर प्रकरणी गंभीर दु:खापात असल्याकारणे पोलिसांना जखमींकडून काही जाब घेता आला नाही व अद्याप मुक्ताईनगर पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही अशी माहिती मुक्ताईनगर पोलिस स्थानकातून मिळाली आहे .
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.