खंडणीखोर भुरट्या पत्रकार टोळी सह जेरबंद-एरंडोल पोलिसांची मोठी कार्यवाही

दिनांक: १८जानेवारी २०२३
एरंडोल-प्रतिनिधि
तुमच्या आँईलमिलची सरकारी कार्यालयात तक्रार करण्यात येईल अशी धमकी एका इसमाकडुन वारंवार येत असुन ७ ते ८ लाखाची खंडणी मांगत आहे अशी तक्रार एरंंडोल पोलिसस्थानकात आली व लागलीच पोलिसांनी सापळा रचला आणि दि. १६ जानेवारी रोजी आठ लोकांची टोळीला जेरबंद करुन एरंडोल पोलिसांनी कार्यवाही केली.
सविस्तार वृत्त असे कि, एरंडोल येथील रहिवासी व बालाजी आँईलमिल चे संचालक आनंद अनिल काबरा यांना एक पुरुष व एक महिला तुमच्या आँईलमिल ची माहिती चा अधिकार अंतर्गत (RTI) सरकारी कार्यालयात तक्रार करण्यात येईल अशी धमकी देत ७ ते ८ लाख रूपये ची मागणी करत आहे. त्या अनुषंगाने एरंडोल पोलिसस्थानक भाग-५ येथे त्यांचा विरुद्ध सीसीटीएनएस गु.र.नं १३/२०२३ भा.दं.वि.कलम ३८४,३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. दि.१६ रोजी खंडणी मागण्यासाठी बालाजी आँईलमिल येथे येणार आहेत अशी माहिती आनंद अनिल काबरा यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर जाधव,सपोनि गणेश अहिरे, पोउनि शरद बागल, पोहेकाॅ अनिल पाटील,पोना मिलिंद कुमावत,संदीप पाटील,जुबेर खाटीक महिला पोना ममता तडवी होमगार्ड पीओ दिनेश पाटील यांचेसह श्री बालाजी आँईलमिल येथे सापळा रचला असता दोन महिला दोन इसम खंडणी मागण्याकरिता आँईलमिल मध्ये आले व एक महिला तीन पुरुष बाहेर थांबले. आईलमिल मध्ये आलेले महिला यांनी आँईलमिल मध्ये अनिल गणपती काबरा यांचाकडून १ लाख रु. खंडणी घेतली असता लागलीच रंगेहाथ छापा टाकून ताब्यात घेण्यात आला छाप्याची चाहूल लागताच बाहेर उभे असलेले एक महिला व तीन पुरुषांनी म्हसावद नाका मार्गे पळ काढणला. पळुन जात असतांना सपोनि गणेश अहिरे, पोना जुबेर खटीक महिला पोना ममता तळवी होमगार्ड पीओ दिनेश पाटील यांने त्यांचा पाठलाग करुन महामार्ग पोलिस केंद्र पाळधी व पाळधी दूरक्षेत्र पोलिस अंमलदाराची मदतीने पकडून ताब्यात घेतले. सदर आरोपिना त्यांचे नाव गाव बाबत विचारणा केली असता-
१) साक्षी राजू तायडे. रा. कुलकर्णी प्लाॅट धम्मनगर भुुुसावळ.
२) मोहिनी विनोद लोखंडे रा.पिंप्री पुणे ह.मु. कुलकर्णी प्लाॅट धम्मनगर भुसावळ.
३) शशिकांत कैलास सोनवणे रा. प्लाॅट नं.२२८ द्वारका नगर भुसावळ.
४) सिद्धार्थ सुनिल सोनवणे रा.झेट.टी.एस रोड ताप्ती क्लब जवळ भुसावळ.
५)रुपाली राजू तायडे रा.कुलकर्णी प्लाॅट धम्मनगर भुसावळ.
६) मिलिंद प्रकाश बोदडे रा. तरणी ता.मोताळा जि.बुलडाणा.
७) गजानन आनंदा बोदडे रा.कुलकर्णी प्लाॅट धम्मनगर भुसावळ.
८) आकाश सुरेश बोदडे रा. कुलकर्णी प्लाॅट धम्मनगर भुसावळ.
असे सांगून मिलिंद प्रकाश बोदडे रा.तरणी ता.मोताळा जि.बुलडाणा, या पूर्वी ही त्याने श्री बालाजी आॅईल मिल वर कार्यवाही करणे बाबत वेळोवेळी वेगवेगळ्या नावाने सरकारी कार्यालयात अर्ज करुन ६० ते ७० हजार रुपये रोख घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपिकडुन खंडणी चे १ लाख रु. रोख ८ मोबाईल , १ स्विफ्ट डिजायर कार असा एकूण १० लाख ०४ हजार किंमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. आरोपी साक्षी राजू तायडे व मोहिनी विनोद लोखंडे यांचा बाबत शाशंकता वाटत असल्याने दोघींना बालसुधारगृह जळगांव येथे जमा करण्यात आले असुन इतर आरोपिना अटक करण्यत आली आहे. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक जळगांव ,अप्पर पोलिस अधीक्षक चाळीसगांव,उपविभागीय पोलिस अधिकारी चाळीसगांव यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन पुढील तपास सपोनि गणेश अहिरे करीत आहेत.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.