राष्ट्रीय युवा दिन व हिंदी सेवा मंडळाचा ७२ वा वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.
भुसावळ-अखिलेशकुमार धिमान
दिनांक:१३ जानेवरी २०२३
श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय येथे काल दिनांक १२ जानेवारी रोजी हिंदी सेवा मंडळाचा ७२ वा वर्धापन दिवस तसेच़ राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एस. पाठक सर,उपप्राचार्य पी.सी.आठवले सर,पर्यवेक्षक ए. एन. माळी सर उपस्थित होते. या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी सेवा मंडळाचे सहमंत्री बिशनचंद्रजी अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन हिंदी सेवा मंडळाचे सहमंत्री अग्रवाल जी व प्रमुख पाहुणे अँड.महेशदत्त तिवारी जी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय युवा दिवस वर प्रेरणादायी खास मुलाखात बघा फक्त स्पीड न्यूज महाराष्ट्र चैनल वर चैनल सबस्क्राइब करायला विसरु नका…
कार्यक्रमात सर्वप्रथम दीप प्रज्वलन माँ सरस्वती पूजन व माँसाहेब जिजाऊ व श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य पाठक सर यांनी अध्यक्ष अग्रवाल जी व तिवारी जी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपप्राचार्य आठवले सर पर्यवेक्षक माळी सर झेड.टी.एस. विभाग प्रमुख गायकवाड मॅडम विद्यालयाच्या सांस्कृतिक प्रमुख कु. मनोरमा ओगले मॅडम यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले उद्घाटनानंतर लगेच विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केले.
कार्यक्रमाची सुरवात श्री.गणेश वंदना, स्वागत गीत , माँसाहेब जिजाऊ जयंती निमित्त एकपात्री अभिनय “मी जिजाऊ बोलते”कु. प्राजक्ता सोनवणे हिच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नूक्कड नाटिका, गरबा, भोले शंकर,आई तुझं देऊळ, जय मल्हार, आणि संत गाडगेबाबांच्या किर्तनाने कार्यक्रमात प्रत्यक्ष बाबांचे दर्शन घडले,असा अभिनय प्रियांशु सुरळकर याने केला .प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध झाले. यानंतर देशभक्ती गीत विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे खूप अप्रतिम असे नृत्य प्रदर्शनकेले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमती खंडेलवाल मॅडम व आभार प्रदर्शन टी .एम. करणकाळ सर यांनी उत्कृष्टरित्या केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील संपूर्ण शिक्षक वर्ग व शिक्षकेतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन विद्यालयाचे प्राचार्य पाठकसर यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा व कार्यक्रमाची व्यवस्था व्यवस्थित पद्धतीने विद्यालयाचे उपप्राचार्य आठवलेसर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.
https://youtube.com/channel/UCIEJK-1t0MDN0BhTn6EbEXg