आनंदयात्री अण्णासाहेब डॉ जी डी बेंडाळे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन.
मू. जे. महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम
दिनांक: १२ जानेवारी २०२३
जळगांव : प्रतिनिधि
जळगाव: येथील मू. जे. महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती निमित्त गुरुवार १२ जानेवारी रोजी आनंदयात्री अण्णासाहेब डॉ जी डी बेंडाळे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेसाठी ऑनलाईन शिक्षणप्रणालीमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अध्ययनाच्या सवयी वाढीस लागत आहेत / नाही.
हा विषय देण्यात आलेला असून महाराष्ट्र भरातून कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धा प्रमुख म्ह्णून प्रा.गणेश सूर्यवंशी काम पाहत आहेत.सदर स्पर्धेचे उदघाटन सहायक शिक्षण उपनिरीक्षक दीपाली पाटील यांचे हस्ते होणार असून मा.नितीन बच्छाव (शिक्षणाधिकारी, जि. प.जळगाव) यांचे हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्ह्णून मा. डी. टी. पाटील (के.सी.ई सोसायटी व्यवस्थापन मंडळ सदस्य), मा.शशिकांत वडोदकर (प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक समन्वयक के सी ई सोसायटी ) , प्राचार्य डॉ.सं. ना.भारंबे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेसाठी उपप्राचार्य प्रा.के.जी.सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, समन्वयक प्रा.उमेश पाटील, प्रा.प्रसाद देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे.असे स्पर्धा प्रमुख प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी कळविले.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.