“मी सावित्री बोलते” ह्या एकपात्री अभिनयातून सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.
दिनांक:-०४ जानेवारी २०२३
भुसावळ- येथील श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय येथे आज दि. ३ जानेवारी २०२३ रोजी क्रांतीज्योती शिक्षणाचे आद्य प्रवर्तक, स्त्री शिक्षणा ची मुहूर्त मेढ व शिक्षणाची कवाडे जिने उघडली अशी क्रांतीमाई सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी विद्यार्थिनींच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सुरुवातीला कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.देशमुख मॅडम, विद्यालयाचे प्राचार्य पाठक सर,पर्यवेक्ष माळीसर उपशिक्षक कुलकर्णी सर, झवर सर व सांस्कृतिक प्रमुख कु. मनोरमा ओगले मॅडम यांनी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्राजक्ता सोनवणे हिने उत्कृष्ट पद्धतीने साजर केले. त्यानंतर एकपात्री अभिनयातून “मी सावित्री बोलते ” या विषयावर प्रणाली भालेराव या विद्यार्थिनीने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपला ॲक्ट सादर केला. त्यानंतर अर्पिता जाधव तिने सुंदर सावित्रीबाईंच्या जीवन चरित्रावर आधारित कविता प्रस्तुत केली तसेच पौर्णिमा इंगळे या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर इंग्रजीतून आपले वक्तव्य प्रस्तुत केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात शिक्षकांच्या मनोगत व्यक्त करत असताना कुलकर्णी सरांनी आपल्या वक्तव्यातून स्त्रियांचा सन्मान करावा व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
तसेच पर्यवेक्षक ए.एन.माळी सरांनी आपल्या अमोघवाणीतून सावित्रीबाई फुले व स्त्री शिक्षण याबद्दल आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राध्यापिका सौ. देशमुख मॅडम यांनी आपल्या अभ्यासपूर्ण वाणीतून व सावित्रीबाई फुले व आजची स्त्री शिक्षण स्त्रीची कर्तव्य व जबाबदाऱ्या याबद्दल आपले प्रखरपणे वक्तव्य केले. यानंतर विद्यार्थिनी नेहा भारद्वाजने आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एस. पाठक सरांनी केले.
रोजची ताजा घडामोडीसाठी “डिजिटल युगाचे निर्भिड माध्यम” स्पीडन्यूज महाराष्ट्र आता पहा यूट्यूब च्या खालील👇लिंक वर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका.
https://youtube.com/channel/UCIEJK-1t0MDN0BhTn6EbEXg
http://www.speednewsmaharshatra.com