साक्रीत महिलांनी शिवधर्माची दिनदर्शिका भेटवस्तू म्हणून देत साजरा केला हळदी -कुंकवाचा कार्यक्रम
साक्री (प्रतिनिधी) मराठा सेवा संघाच्या प्रकाशीत केलेल्या शिवधर्म दिनदर्शिकेच्या साक्री येथील प्रकाशनाप्रसंगी संघाध्यक्ष प्राचार्य बी.एम् भामरें व प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे यांनी केलेल्या आवाहना नंतर साक्रीत महिलांनी हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात भेटवस्तू म्हणून शिवधर्म दिनदर्शिका देण्यास सुरुवात केली असल्याने साक्री तालुका मराठा सेवा संघाच्या पदधिका-यानी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या आठवड्यात साक्री तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने सेवा संघांच्या शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले होते.त्या प्रसंगी सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्राचार्य बी.एम् भामरें म्हणाले होते की,मराठा सेवा संघाने प्रकाशीत केलेली शिवधर्म दिनदर्शिका ही केवळ तारीख व वार सांगणारी नसुन ती बहुजनांच्या महानायकांच्या प्रेरणादायी कर्य कर्तुत्वाची आठवण करून देणारी आहे. त्यांच्या जयंत्या व पुण्यतिथींच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची ओळख करून घेता येणार आहे.जी ओळख आपले जीवन समृद्ध करायला मदत करेल असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच प्राचार्य डाॅ. राजेंद्र आहिरे यांनी महीलांनी आपल्या हळदी -कुंकवा सारख्या कार्यक्रमात शिवधर्माची दिनदर्शिका भेटवस्तू म्हणून द्यावी.असे आवाहन केले होते.
या आवाहनास प्रतिसाद म्हणून साक्रीतील शिवाजी नगर नं 2 च्या जयश्री भामरे व गोपाळ नगर मधील नयना अहिरे या महिलांनी यंदाच्या संक्रांतीच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात शिवधर्म दिनदर्शिका आपल्या महिला सखींना भेट वस्तू म्हणून देत शुभारंभ केला. मराठा सेवा संघ साक्रीच्या पदाधिका-यांनी केलेल्या आवाहनास या मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल पदाधिका-यांनी महिलाचे आभार व्यक्त केले असून महिला भगिनींनी आता या पुढे एखाद्या कार्यक्रमात कुणाचे स्वागत, सत्कार करतांना किंवा कोकीळेच्या– महालक्षमीच्या व्रत उद्यापना प्रसंगी व मैत्रिणीचे वाढदिवस साजरे करतांना शुभेच्छां बरोबर भेटवस्तू देतांना आपल्या युगपुरूषांची, क्रांतीकारक व समाज सुधारकांच्या जीवन चरीत्रांची, सानेगुरुजींच्या ‘शामची आई’ आदि पुस्तके भेटे वस्तू म्हणून देत हे सणोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.