संतांच्या भूमीमध्ये हातभट्टी अथवा गावठी देशी दारूचा महापुर
मुक्ताईनगर (सचिन झनके) तालुक्यातील चांगदेव येथील गावामध्ये देशी दारू अथवा गावठी दारू चा महापूर होताना दिसून येत आहे. काही वर्षा आधी पाण्याचा महापुर होता. परंतु आता गावठी देशी विदेशी दारू चा महापूर होताना दिसून येत आहे. याकडे प्रशासन का लक्ष देत नाही असा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत आहे.
अशा बनावट दारुमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येतांना आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जाऊन त्या आजाराशी झुंज द्यावी लागत आहे. या अशा व्यसनामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झालेले आपल्यांना दिसून येत आहे. याकडे स्थानिक असलेले सरपंच यांनीसुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. यामध्ये आपण एकीकडे संतांची भूमी म्हणून संबोधले जातो परंतु अशा या संताच्या भूमीमध्ये असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात होतात असतात. तर, बीट हवलदार करतात तरी काय ? बघून देखील काढून टाकला जात आहे. यात आर्थिकचा विषय तर, नाही ना? असा प्रश्न चांगदेव येथील महिलांना पडलेला आहे. या अवैध दारू व्यवसायामुळे किती संसाराचे नुकसान झाले असून कुंकू पुसले गेले आहे तर स्थानिक पोलिस प्रशासन याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न चांगदेव वासियांना पडलेला आहे. दरम्यान, एकीकडे प्रशासन म्हणत आहे की प्लास्टिक मुक्त करा परंतु या अशा अवैध दारू व्यवसायांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर जास्त प्रमाणात होत आहे.