खामखेडा पुल ठरला सुसाईड पॉईंट
मुक्ताईनगर (सचिन झनके) प्रतिनिधी (शैलेश गुरचळ) मुक्ताईनगर तालुक्यातील मध्यप्रदेश व महाराष्ट्राला जोडला गेलेला खामखेडा पुल आज ठरलेला आहे आत्महत्या सुसाईट पॉईंट २०१६ ते २०२२ या कालावधीमध्ये सर्वात जास्त मृत्यू झालेले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील अजय इंगळे या तरुणाने आत्महत्या केली आहे. परिवारातील लोकांना अजूनही एक मोठा प्रश्न पडलेला आहे मुलाने आत्महत्या का केली असावी मित्र परिवारातील सर्व मित्र या प्रश्नाला सामोरे जात आहे. तसेच शेंमदा, डोलारखेडा, पुरणार फाटा, या गावातील सर्वाधिक तरुण मुलं कौटुंबिक मानसिक छोट्या-मोठ्या भांडणातून स्वतःच्या प्राण त्यागण्यासाठी खामखेडा पुलावरून दुचाकीने येत असतात. दुचाकी लावून पुलावर उभे राहून पूर्णा नदीच्या पाण्यामध्ये उडी घेतात. हा प्रकार सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये २०१६ ते २०२२ घडलेला या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. त्याकरिता स्थानिक प्रशासकीय मंडळाने तरुण मुलांचे कौन्सलिंग मार्गदर्शन करावे जेणेकरून असे पाऊण उचलणार नाही.