जिल्हास्तरीय योगा स्पर्धेत अतुल्य स्पोर्ट्सची सुवर्ण कामगिरी
ठाणे (देविदास भोईर) हरू युवा केंद्र ठाणे जिल्हा आयोजित जिल्हास्तरीय योगा स्पर्धेत अतुल्य स्पोर्ट्स फाउंडेशन च्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण कामगिरी केली. १७-२१ गटात सहभागी होत अतुल्य स्पोर्ट्सच्या देविदास कामडी याने सुवर्ण पदक पटकावले. तर २१-२५ गटात अंकुश कामडी याने कांस्य पदकाची कमाई केली. तसेच अनिता कवटे, सचिन वारे व ज्योत्स्ना वडाळी यांनी योगाची चित्तथरारक जलदीप प्रात्यक्षिके सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली.
अतुल्य स्पोर्ट्स फाउंडेशन ही संस्था ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक व क्रीडात्मक विकासासाठी प्रयत्न करते.या संस्थेने आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. व ते विविध पातळीवर आपल्या यशाचा ठसा उमटवतांना दिसत आहेत. परंतु नेहरु युवा केंद्र ठाणे व बृहन ठाणे योगा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय योगा स्पर्धेच्या माध्यमातून ही संधी खेळाडूंना उपलब्ध झाली व त्या संधीचे सोने करीत या खेळाडूंनी दोन पदके पटकावली. संस्थेचे संस्थापक व प्रमुख प्रशिक्षक पवन आडवळे हे या मुलांना मार्गदर्शन करीत असतात. मुलांनी मिळविलेल्या या यशावर प्रशिक्षक पवन आडवळे यांनी मुलांचे अभिनंदन केले. तसेच अतुल्य स्पोर्ट्स ला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे तनया शिंत्रे व सपना विसपुते यांनी देखील मुलांचे अभिनंदन केले.