धुळेकरांचे आरोग्य धोक्यात, विविध आजाराला दिले जात आहे प्रशासनाकडून आमंत्रण
वरखेडे रस्त्यावरील कंपोस्ट डेपोची भयानक स्थिती कचरा व घाण डेपोत टाकण्यांऐवजी रस्त्यावर कचरा व घाण कंपोस्ट डेपोत न टाकता बाहेर टाकणारे वाहनधारकावर कडक कार्यवाही करा - मागणी
धुळे : शहरसह परीसरातील घाण कचरा हा जेथे टाकला जातो त्या शहरालगत असलेल्या वरखेडे रस्त्यावरील कंपोस्ट डेपोची क्षमता चांगली असून सुध्दा वाहनधारकांचा हलगर्जीपणा आणि कंपोस्ट डेपोवर लक्ष देणाऱ्या कर्मचारीचे दुर्लक्ष यामुळे दुरावस्था झाल्यांचे म्हटले जात आहे. यातून स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र दिसून येत आहे.
कचरा वाहतुक करणारे वाहनधारक कंपोस्ट डेपोत कचरा टाकण्याऐवजी सरळ रस्त्याच्या कडेला डेपोच्या बाहेर कचरा टाकून निघून जातात त्याच्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास तर होतोच पण आरोग्याला ही ते घातक ठरत आहे.
याबाबत वेळोवेळी संबंधीत कंपोस्ट डेपोवर लक्ष देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कल्पना देण्यांत येवून सुध्दा लक्ष दिले जात नाही कचरा घाण कंपोस्ट डेपोच्या बाहेर येवु नये, जर कचरा डेपोच्या बाहेर आल्यांचे निदर्शनास किंवा तक्रार आल्यास संबंधीत कर्मचारीवर कडक कार्यवाही करण्यांत येईल असा आदेश मनपा आयुक्त शेख यांनी दिलेले असताना सुध्दा सदरच्या आदेशाचे पालण होतांना दिसत नाही. स्वच्छता पाहणीसाठी समिती येत असल्यांचे कळताच तेव्हा सदरचे कर्मचारी जागे होतात आणि कंपोस्ट डेपोची साफ सफाईसह इतर कामे करुन घेण्यात मग्न दिसतात पण समिती माघारी फिरली तर परीस्थिती जैसे थे असते म्हणुन स्वच्छतेबाबत ठोस पाऊल मनपाकडून उचलणे गरजचे आहे. कंपोस्ट डेपोच्या बाहेर कचरा येणार नाही यांची खबरदारी घेणे आवश्यक आहे या गंभीर समस्येकडे मनपा आयुक्तांनी जातीने लक्ष घ
द्यावे आणि समस्येवर कायमचा तोडगा काढावा समस्या जातीने दूर करावी अशी अपेक्षा लोकांकडून होत आहे तसे न झाल्यांस लोकांकडून आंदोलनाचा मार्ग अवलंबविला जाईल अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.