तापी काठावरील गावात विकासाची गंगा आणु : जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके
सोनेवाडी येथे जलशुध्दीकरण सयंत्राचे उद्घाटन व संरक्षक भिंतीच्या कामाचे भुमीपुजन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते संपन्न
शिंदखेडा (प्रतिनिधी) : तालुक्यात तीन वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या लोकांनी या तापीकाठ भागात कधीही लक्ष दिले नाही. महाराष्ट्रात विकासाची खरी घोडदौड मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळात सुरु झाली असून तापी काठावरील गावात येणाऱ्या काळात विकासाची गंगा आणु, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी येथे व्यक्त केला. जिल्हा वार्षिक योजना नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत सोनेवाडी येथे जलशुद्धीकरण सयंत्र (RO फिल्टर) लोकार्पण व नाल्याकाठी संरक्षक भिंतीच्या कामाचे भुमीपूजन सोहळा मंगळवार (दि.9) रोजी उत्साहात संपन्न झाला. या आर.ओ. फिल्टरचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी फित कापून केले. याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सद्यस्थितीत विविध साथींच्या आजारांमुळे जनता त्रस्त आहे. आरोग्याचे जे विविध विकार होतात त्याला अस्वच्छ पाणी जबाबदार असते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जलशुध्दीकरण सयंत्रामुळे सोनेवाडी ग्रामस्थांना यापुढे शुध्द पाणी मिळेल. यामुळे आरोग्याचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. बाजारात एक लीटर पाणी वीस रुपयांना मिळते. मात्र गावात पाच रुपयात वीस लीटर शुध्द पाणी मिळेल. नेवाडे-सोनेवाडी गावांचा ऋणानुबंध असून या परिसरात रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय बनवायचा मानस आहे. गावातील तरुण मुलांसाठी ओपन जीमचे देखील प्रयोजन आहे. गावात अनेक विकास कामे प्रलंबित आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात केलेल्या कामांची माहिती देतांना श्री.साळुंके पुढे म्हणाले की, तालुक्यात तीन वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या लोकांनी या तापीकाठ भागात कधीही लक्ष दिले नाही. महाराष्ट्रात विकासाची खरी घोडदौड मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळात सुरु झाली असून तापी काठावरील गावात येणाऱ्या काळात विकासाची गंगा आणु, असा निर्धार साळुंके यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, दोंडाईचा उपजिल्हा संघटक कल्याण बागल, तालुकाप्रमुख गिरीश देसले, विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, शहरप्रमुख संतोष देसले, तालुका समन्वयक विनायक पवार, सोनेवाडीच्या सरपंच भिकुबाई सोनवणे, उपसरपंच हिराबाई भील, ग्रामसेवक एन.बी.देवरे, प्रवीण सोनवणे, देविदास भील, गुलाब कुंवर, प्रभाकर पाटील, भाऊसाहेब पाटील, विनोद पाटील, भाईदास भील, निंबा पाटील, अरुण पाटील, कैलास पिंपळे, नंदलाल पाटील, नाना भील, चुनीलाल पाटील, स्कायटेक कंपनीचे दिनेश कुंवर आदींसह सोनेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.