आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नांना यश..! शहरातील साक्रीरोडवरील मोती नाल्यावरील असलेल्या पुलाचे होणार रुंदीकरण.
पुलाच्या रुंदीकरणासाठी ४ कोटी मंजूर..! पुलाच्या रुंदीकरणामुळे साक्री रोडवरील वाहतुक कोंडीची समस्या सुटणार..
धुळे : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या साक्री रोडवरील असलेल्या मोती नाल्यावरून शहरी भागातील बाजारपेठ परिसरात नेहमी प्रचंड गर्दी होत असते. त्यात शाळा आणि महाविद्यालय येथे जाणारे विद्यार्थी, लोटगाडीवर व रस्त्यावर भाजीपाला व व्यवसाय करणारे आणि सणांनिमित्त इतर साहित्य विक्री करणारे लहान मोठे व्यापारी तसेच या परिसरात असलेल्या लहान मोठ्या मार्केट मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची आणि ग्राहकांची या मोतीनाल्याच्या पुलावर होत असलेल्या गर्दीमुळे या मोती नाल्याच्या परिसरातून जाणे-येणे अतिशय कठीण होते. त्यातच रिक्षा, दुचाकी वाहने, काही चार चाकी वाहने यांची सदरच्या ठिकाणी हा पूल लहान असल्याने रस्त्यावर प्रचंड गर्दी होत होती. अनेकदा याठिकाणी अपघात देखील झाले होते. यामुळे या मोतीनाल्यावरील व साक्रीरोड वरील वाहतुक सुरळीत व्हावी म्हणून मोतीनाल्यावर असलेल्या पुलाचे रुंदीकरण व्हावे अशी धुळे शहराचे आमदार यांची ईच्छा होती. यासाठी त्यांनी राज्य शासनाच्या सन २०२१-२२ च्या अर्थ संकल्पीय नाबार्ड निधीतून ४ कोटी रुपयांची तरदुत करण्याची मागणी केली होती.
यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित दादा पवार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला यश आले असून सदरच्या पुलाच्या रुंदीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली असून लवकरच याठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. या पुलाच्या रुंदिकरणामुळे साक्री रोडवरील वाहतूक सुरळीत होणार असून शहराच्या विकासात भर पडणार आहे.