महाराष्ट्र
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व माजी सभापती विश्वनाथ पाटील यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घातला.
यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन मोहन गोसावी, सतीश पाटील, पुरुषोत्तम गोसावी, अमोल पाटील, प्राध्यापक मनोज पाटील, ग्रामपंचायत सदस्य विठोबा पाटील, गोपाल राउळ, आखाडु ढिवरे, रतिलाल मंगळे, ग्रामपंचायत सदस्य लहानु मंगळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.



