महाराष्ट्र
धोदलगाव येथे ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
वैजापूर (भिमसिग कहाटे) तालुक्यातील धोदलगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून भाजपा तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांच्या हस्ते भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात जंयती साजरी करण्यात आली.
या मिरवणुकीत भाजपा कोषाध्यक्ष संतोष मिसाळ, शक्ति केद्र प्रमुख संतोष आवारे, जेष्ठ नेते विपिन साळे जंयती उत्सव समिती अध्यक्ष राजु सोळस, विरप्पन सोळस, कडु सोळस, नाक्षण सोळससह गावातिल असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.