नवजीवननगरात खुल्या अभ्यासिकेचे उद्घाटन
धुळे (स्वप्नील मराठे) धुळे शहरातील नवजीवन नगर येथे बुधवारी खुल्या अभ्यासिकेचे पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. गरीब, श्रमीकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी पर्याय ही स्वयंसेवी संस्था शैक्षणिक सुविधा व शिक्षक उपलब्ध करणार आहे.
खुल्या अभ्यासिकेत लॉन्स तयार करण्यात येणार असून दररोज संद्याकाळी दोन तास परिसरातील विद्यार्थ्यांना शिकवले जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विवेक जाधव यांनी दिली. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी त्यांना चित्रकलेचे साहित्य वाटप करण्यात आले. चित्रकला वही, रंगपेटी, चॉकलेट व खाऊचा डबा विद्यार्थ्यांना देण्यात आला. जयंती मित्ताने बॅनर, होर्डिंग्ज यावर खर्च न करता शैक्षणिक उपक्रम घेण्यात आल्याने कौतूक केले जात आहे.
विद्यार्थाना माहिती देतांना प्रभारी पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, सोबत सिने आर्ट डिरेक्टर विवेक जाधव व मान्यवर यावेळी पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधतांन शिक्षणाचे महत्व विषद केले. तसेच स्वच्छता व मुल्यशिक्षण विषयाचे मार्गदर्शन केले.