शिंदखेडा तालुक्यात दलवाडे प्र.न. येथे प्रथमच नवीन संकल्पना ; शिव जयंतीच्या शुभ मुहूर्तावर ४० फुटाचा शिव स्तंभाचे ध्वजारोहण
शिंदखेडा (प्रतिनिधी) तालुक्यातील दलवाडे प्र.न. येथे शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक गिरासे यांच्या संकल्पनेतून तालुक्यात प्रथमच ४० फुटाचा शिव स्तंभाचे ध्वजारोहन संदीप बेडसे राष्ट्रवादी चे विधानसभेचे उमेदवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या वेळी दिपक गिरासे यांनी त्यांच्या भाषणातून संबोधित करताना शिवस्मारक व छत्रपती शिवाजी महाराज बाल उद्यान याचे काम मी सुरू केले आहे, काम प्रगतिपथावर असून मला विश्वास आहे की तालुक्यात सर्वात आकर्षक ठरेल असे स्मारक व उद्यान येत्या काही वर्षात मी पूर्ण करणार तसेच वर्षातून शिव जयंती व पुण्यतिथी या दिवशी शुभम स्तंभाचे नवीन ध्वजारोहण करण्यात येईल हा तालुक्यात प्रथमच एक नवीन कार्यक्रम आहे यातून नवी पिढीला नवी ऊर्जा मिळेल. त्यानंतर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संदीप बेडसे यांनी बोलताना सांगितले की या स्मारकासाठी होईल तेवढी मदत व निधीचा प्रयत्न मी करेल व हा आजचा ध्वज स्तंभ कार्यक्रम कौतुकास्पद आहे, दीपक गिरासे यांनी एक नवीन आदर्श निर्माण करत आपल्या गावासाठी नवीन नवीन संकल्पना घेऊन येत विकास करतांना ते दिसत आहेत. या कार्यक्रमात सर्व शिवभक्तांना मध्ये जोश दिसत होता जोर जोरात शिवगर्जना होत होत्या. गावात उत्साहाचे वातावरण होते.
ह्या शुभ कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गावाचे विद्यमान सरपंच रजेसिंग गिरासे, राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे जिल्हा अध्यक्ष दीपक जगताप, दलवाडे ग्रामपंचायतीचे गटनेते तसेच राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक गिरासे, माजी सरपंच ज्ञानेश भाऊ देसले, युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख दुर्गेश पाटील, दोंडाईचा शहराचे कार्याध्यक्ष दयाराम कुवर, रवी बापू पाटील, ग्राम. सदस्य लिलेश देसले, पोलीस पाटील अनंत देशमुख, शशिधर देसले, ग्राम. सदस्य प्रमोद देसले, ग्राम. सदस्य अशोक धनगरे, ग्राम. सदस्य भटू देसले, रमेश दादा देसले, भाऊसाहेब देसले, राहुल कोळी, दरबार गिरासे, मनोज कोळी, संदीप (पप्पू) देशमुख, बबलू देसले, प्रदीप गिरासे, राजेंद्र देसले, नंदराम देसले, तुषार देशमुख, जितेंद्र कोळी, दुर्योधन देसले, अण्णा ठाकरे, वसंत मोरे, भिका देसले, सुभाष देसले, गावातील सर्व समाजातील सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ मंडळी तसेच तरुण युवक शेकडो च्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार लिलेश देसले यांनी मानले.