शिंदखेडा येथील गांधी चौकात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने व्याख्यान माला
सांस्कृतिक कार्यक्रम यासह विविध कार्यक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील गांधी चौकात शिवजयंती उत्सव समिती शिंदखेडा वतीने आयोजित पुणे येथील शिवव्याख्याते प्रशांत लवटे पाटील यांचे व्याख्यान तर शालेय विद्यार्थीचा भारत के बुलंद आवाज गृप तर्फ सांस्कृतिक कार्यक्रम ,आदिवासी नृत्य , ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने विविध आजारावर जनजागृती चित्र व पोस्टर प्रदर्शन, शिवाजी महाराज यांचे चलचित्र जिवंत देखावा उभा केला होता. सदर कार्यक्रमाचे आयोजन समिती अध्यक्ष चेतन देसले , अरुण देसले ,सुयोग भदाणे यासह पदाधिकारी यांनी केले होते.
नुकत्याच संपन्न झालेल्या गांधी चौकात शिवजयंती उत्सव समितीतर्फे विविध प्रकारच्या कार्यक्रमानी शहराचे लक्ष वेधून घेतले.सुरुवातीला पुणे येथील शिवव्याख्याते प्रशांत लवटे पाटील यांनी आपल्या सुरेख शैलितुन स्वराज्य संस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न स्वाभिमान राज्यनिष्ठा स्रीचा आदर शेतकरी विषयीच्या कळकळ शिवाजी महाराजांमध्ये होती विविध प्रसंगातून शिवाजी महाराज समोर उभा केला.महाराजांचे आचार विचार आजच्या तरुण पिढीने आचरणात आणणे गरजेचे आहे असे सांगितले.तसेच शालेय विद्यार्थी चा भारत के बुलंद आवाज गृपने वक्तृत्व , नृत्य पोवाडा आदी सादर केले.त्यात पवार हिचे वक्तृत्व तर हर्षदा चौधरी हिचा हुबेहुब पोवाडा ने प्रेक्षकाची मने जिंकली.
शिदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने विविध आजारावर जनजागृती चित्र प्रदर्शन आयोजित केले होते.त्याचप्रमाणे शिवाजी महाराज बबलू मराठे यांनी पोषाख परिधान करून रथावर आरुळ होवून देखावा उभा केला होता.आदिवासी नृत्य सादर करून शहरवासियासाठी आकर्षण ठरली.हयावेळी प्रतिमा पुजनासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर , शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, राष्ट्र वादी माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे , जि.प.सदस्य ज्ञानेश्वर भामरे. पी.आय.सुनिल भाबड , माजी नगराध्यक्ष दिपक देसले, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, नगरसेवक दिपक अहिरे, उदय देसले , शिवसेना तालुका प्रमुख गिरीश देसले, शहराध्यक्ष संतोष देसले, संघटक गणेश परदेशी, समन्वयक विनायक पवार, राष्ट्र वादी शहराध्यक्ष प्रविण पाटील , विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरज देसले, एल.डी.देसले, युवराज खैरनार, शशीकांत बैसाणे, सुनील थोरात, मयुरेश अग्रवाल, समाधान मिस्तरी फौजी यासह पदाधिकारी व शिवप्रेमी मोठया संख्येने सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष चेतन देसलेेेे, रोहन कौठळकर, अरुण देसलेेेे, सुयोग भदाणे व सदस्यांनी परिश्रम घेतले.