नरंगल येथे दर रविवारी आठवडी बाजार होणार : सरपंच प्रा. शोभाताई कर्णे
देगलूर (मारोती हनेगावे) तालुक्यातील नरंगल हे लोकसंख्येच्या व पंचक्रोशी च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र असे गाव आहे. तेथील लोकसंख्या 6000 च्या जवळपास असून हायवे वरील मोठे गाव आहे. पंचक्रोशीतील गावांचा विचार करून जनतेच्या सोयीसुविधा साठी नरंगल चे सरपंच प्राध्यापक शोभाताई कर्णे यांच्या पुढाकाराने गावातील ग्रामसभेच्या सहमतीने व तंटामुक्ती, शालेय समिती, सेवा सहकारी सोसायटी,व गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या व नवतरूण मंडळींच्या, सहकार्याने महाराष्ट्र दिनापासून येथे दर रविवारी आठवडी बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरपंच प्राध्यापक शोभाताई कर्णे ह्या भाजीपाला उत्पादक, फळ विक्रेते, खेळणी विक्रेते, कडधान्य व मसाला विक्रेते,कापड विक्रेते, व अन्य छोटे मोठे विक्रेते यांनी नरंगल येथे यावे अशी विनंती त्यांनी असोशियनकडे केलेली आहे. चार दिवसांपूर्वी त्यांनी पर्यावरण पूरक असा कापडी पिशवी मोफत वाटपाचा कार्यक्रम त्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतलेला आहे. त्यांच्या या उपक्रमशील कार्याने पंचक्रोशीतील महिला व नागरिकांमध्ये नरंगल च्या महिला सरपंचा बद्दल कर्तव्यदक्ष सरपंच म्हणून विषय चर्चिला जात आहे. व पंचक्रोशीमध्ये त्यांच्या या उपक्रमशिल कार्याबद्दल समाधान व्यक्त केला जात आहे. महिलांनी चुल आणी मुल सांभाळतच समाजकारणात आले पाहिजे असे आव्हान त्यांनी सर्व महिलांना केले.