महाराष्ट्र
खड्ड्यांचा बसतोय दणका अन् ढिला होतोय मणका ; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकर लक्ष द्यावे
मालपुर : मालपुर पासुन दोन किलोमीटरवर व दोंडाईचा शहर पासुन तीन किलोमीटर वर रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्डयांत रस्ता असा प्रश्न वाहन धारकांना पडतो याकडे मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केले जात आहे.
दोंडाईचा ते मालपुर प्रवास करणारे प्रवाशी या खड्डेमय रस्त्याला कंटाळले आहेत. तरी जिथे खड्डे पडलेले आहेत. तिथे फक्त मलम पट्टी काम करुन निघुन जातात म्हणुन ड्रायवर लोकांचे प्रश्न आहे तरी हे काम लवकरात लवकर खड्डे बुजले गेले नाहीत तर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मालपुर चालक मालक संघटनाचे रमेश धनगर, गोपाल शिवदे, पंकज पाटील, प्रदिप महाराज, विजय कोळी, भरत कोळी, पुनम कोळी, धनराज इंदवे आदी प्रवासी संघटना व मालपुर मोटरसायकल चालक तर्फे हि माहिती मिळाली.