महाराष्ट्र
बोरद आरोग्यवर्धिनी केंद्र आरोग्य वर्धनी दिवस साजरा
बोरद (योगेश गोसावी) आज प्राथमिक आरोग्य केंद्र बोरद येथे आरोग्यवर्धनी दिवस अंतर्गत विडिओ कॉन्फरन्स सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेला देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी संभोधित केले.
सदर सभेचे नियोजन बोरद आरोग्य वर्धिनी केंद्रात करण्यात आल्याने सभेला जिल्हा परिषद सदस्य सुनीता पवार, तसेच तळोदा पंचायत समितीचे सदस्य विजय राणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण, बोरद आरोग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण लांडगे, डॉ.पंकज पावरा, सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा, आशा सुपरवायझर तालुका स्तरीय कर्मचारी देवेंद्र राठोड उपस्थित होते.



