महाराष्ट्र
‘शासन आपल्या दारी’ बोदवड तहसीलदार यांचा लोकाभिमुख उपक्रम
बोदवड (सतीश बावस्कर) शासन आपल्या दारी उपक्रमांदर्गत रेशन कार्ड तक्रार निवारण शिबिराचे आयोजन तालुक्यातील विविध गावात आयोजित केले गेले. महसूल विभाग अंतर्गत येणारा पुरवठा विभाग सर्व सामान्य माणसांशी निगडित असल्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गरजू व्यक्ती ला योजनेचा लाभ मिळावा म्हणून नाळगाव, कोल्हाडी , चीसखेळसिम, शिरसाळे, सोनोटि, हिंगणे, आमदगाव , येथे आज रोजी तहसील कार्यालया मार्फत आयोजन केले गेले होते हे शिबिर संपूर्ण तालुक्यात आयोजित केले जाणार असून गरजू लाभार्थ्यांना ह्या शिबिराचा लाभ मिळणार आहे.