महाराष्ट्र

बोरगांव येथे वर्गखोलीचे उद्घाटन

शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरगांव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील वर्गखोलीचे उद्घाटन प्रियदर्शिनी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली, जि प अध्यक्ष डॉ तुषारभाऊ रंधे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शाळेतील जुनी वर्ग खोली गळती, पडीत व जीर्ण झाली होती. बऱ्याच वर्षापासून शाळेतील विद्यार्थी वर्गखोली अभावी एकाच वर्गात बसत होते. म्हणून बोरगाव उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया व ग्रामस्थांनी जि. प. सदस्या अभिलाषा भरत पाटील यांना विनंती केल्यावर सदरहू वर्ग खोली धुळे जि प शिक्षण सभापती सौ मंगला सुरेश पाटील यांच्या शिफारशीने शिक्षण समिती निधीतून मंजूर करण्यात आली. तसेच एका वर्ग खोलीची दुरुस्ती देखील करण्यात आली. जून २०२१ मध्ये वर्गखोली बांधकामाचे भूमिपूजन कारखाना संचालक तथा पं स माजी सदस्य भरत भिलाजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.

याकामी राज्याचे माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, जि.प. अध्यक्ष डॉ तुषार रंधे, धुळे जि.प. शिक्षण सभापती सौ मंगला सुरेश पाटील, नगरसेवक अशोक कलाल, वनावल गट जि प सदस्या अभिलाषा भरत पाटील यांची मदत लाभली.

उद्घाटन प्रसंगी शिसाका संचालक भरत भिलाजी पाटील, पं स सदस्या विठाबाई निंबा पाटील, मा पं स उपसभापती जगतसिंग राजपूत, बोरगाव उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, मार्केट कमिटी संचालक बाबा पाटील, पोलीस पाटील मनोहर पाटील, सोसायटी चेअरमन खंडू झिंगा राजपूत, माजी उपसरपंच रजेसिंग राजपूत, ग्राम पंचायत सदस्य दीपक राजपूत, तानकू भिल, बापू भिल, पांडुरंग कोळी, कौतीक तोताराम येशी, धनसिंग राजपूत, बाबूलाल बोरगावकर, गुलाब फुला भिल, संजीव सजन पाटील, भानुदास येशी, सरकार राजपूत, जयसिंग राजपूत, डी. जे. राजपूत, ठेकेदार मेहुल राजपूत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बी.डी सिसोदिया सरांनी तर आभार प्रदर्शन उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे