महाराष्ट्र

नाशिक शहरात विना परवानगी भोंगे लावल्यास तडीपारी

नाशिक (मनोज साठे) शहरातील सर्व प्रकारचे भोंगे आणि लाऊडस्पीकर उतरवण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. तसेच कुणीही परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक अथवा अन्य ठिकाणी लाऊडस्पीकर लावता येणार नाही, असं नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे अनधिकृत भोंग्यांबाबत परिपत्रक जारी करणारं नाशिक हे राज्यातील पहिलं शहर ठरलंय अस म्हणावं लागेल. सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यांच्या परवानगीसाठी ३ मे २०२२ पर्यंत नियमानुसार रीतसर परवानगी घेणे आवश्यक राहील.त्याचप्रमाणे मशिदीपासून शंभर मीटरच्या आत पाच वेळेच्या नमाजाच्या वेळी कुणालाही भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणता येणार नाही. अन्यथा नाशिक शहरात आता भोंगे लावल्यास चार महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

भोंगे लावण्याच्या नावाखाली कोणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना थेट 4 महिने तुरुंगवासाची शिक्षा याशिवाय शहरातून 6 महिन्यासाठी तडीपार करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी घेतल्याने हा निर्णय चर्चेचा विषय बनला आहे.त्यामुळे आता मनसे काय भूमिका घेणार याचीही चर्चा सुरु झाली आहे. हनुमान चालीसा प्रकरणात नाशिकच्या पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी उशिरा मध्यरात्री आदेश काढत मनसेच्या भोंग्यांना चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे. हनुमान चालीसा म्हणू इच्छिणाऱ्यांना आता 3 मेपर्यंत पोलीस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी मागताना मशिदीपासून शंभर मीटर दूर अंतरावर आणि नमाजाच्या वेळेपूर्वी किंवा नंतर पंधरा मिनिटांचे बंधन यामध्ये लावण्यात आले आहे. तसेच हनुमान चालीसा म्हणताना प्रदूषण महामंडळाचे प्रचलित ध्वनी प्रदूषण नियम पाळावे लागणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे