महाराष्ट्र
साक्री येथे मराठी पत्रकार दिन साजरा
साक्री (प्रतिनिधी) मराठी पत्रकार सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या हस्ते करून मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
साक्री शहरातील पोलीस ठाण्यात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक एल एच गायकवाड, प्रल्हाद बनसोडे आणि पत्रकार आबा सोनवणे, जी.टी.मोहिते, विद्यानंद पाटील, बाबूदिन शाह, रवींद्र देवरे, शरद चव्हाण, धनंजय सोनवणे, जितेंद्र जगदाळे, प्रकाश वाघ, संगपाल मोरे, सतीश पेंढारकर, किशोर गादेकर, महेंद्र चंदेल, रतन सोनवणे, ज्ञानेश्वर ढालवाले आदी पत्रकार उपस्थित होते.