राष्ट्रवादीकडून युथ कार्निवल ऑडिशनचे यशस्वी आयोजन
धुळे (प्रतिनिधी) धुळे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र युथ कार्निवल ऑडिशन अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन काल राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झाले.
या ठिकाणी चित्रकला, डान्सिंग, ग्रुपनृत्य, गायन, मॉडेलिंग, आदी स्पर्धेचे आयोजन केले होते. या अंतर्गत धुळे जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी, युवकांनी राष्ट्रवादी भवन येथे आपले कलागुण सादर केले. या कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावर निवडलेल्या स्पर्धा स्पर्धकाला विभागीय स्तरावर सेमी फायनल व मुंबई येथे ग्रँड फायनल मध्ये सहभागी होता येईल. ही अतिशय चांगली संधी धुळे जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने महाराष्ट्र युथ कार्निवलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. सदर कार्यक्रमाला राष्ट्वादी विध्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आकाश झांबरे पाटील, नीलू मेहता, पल्लवी पत्की, सुरज कुशवाह, अतुल कुंजर आदी परीक्षक म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून किरण नाना शिंदे, रणजीत राजे भोसले, दिनेश मोरे, राजेंद्र चितोडकर, महेंद्र शिरसाट, मंगेश जगताप, राजू चौधरी, सरोजताई कदम, जमीर शेख, सलीम लंबू, ज्ञानेश्वर माळी, आशिष अहिरे, बरकत शहा, स्वामिनी पारखे, योगिता गिरासे, उमेर अन्सारी, लल्लु भैय्या, वासिममंत्री, मुक्तार मन्सुरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयेश साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष राज कोळी, भावेश भदाणे, प्रसाद दाळवाले, विश्वजीत देसले, मोनेश पाटील, आयुष काकडे, प्रणव भोसले, शुभम भदाणे, आकाश विभूते, अक्षय खैरनार, गोपाळ वाणी, कल्पेश मगर, टीमने केले होते.



